संस्थेविषयी

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

स्थापना:

जागृती शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना श्री. श्रीकांत देशपांडे यांच्या दूरदृष्टीने सन 1991 मध्ये झाली. दि. 02 जून 2003 पासून गुरुकूलाचे इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग प्रथमतः 14 विद्याथ्र्यांसह चालू करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर 2003 पर्यंत विद्यार्थीसंख्या 36 झाली.

सन 2004 च्या जून महिन्यात प्रथमतः शिशुवर्ग, बालवर्ग आणि इयत्ता पहिली आणि नैसर्गिक वाढीने इयत्ता आठवी आणि सोबत इयत्ता नववी असे पाच वर्ग सुरु झाले.

माहे डिसेंबर 2003 मध्ये अर्धा एकर जागा गुरुकुलसाठी विकत घेण्यात आली. डिसेंबर 2003 मध्ये भूमीपूजन करण्यात आले आणि योगी श्री अरविंद गुरुकुलाच्या वास्तूचे दि.05 डिसेंबर 2004 रोजी मा. आमदार श्री. किसनराव कथोरे आणि मा. श्री. रविंद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्राॅडक्टस् यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

सन 2008 मध्ये आॅक्टोबर महिन्यात स्वातंत्र्यवीर विनाायक दामोदर सावरकर तरणतलाव आणि क्रीडासंकुलाचे भूमीपूजन झाले. त्यानंतर दि. 26 जानेवारी 2010 रोजी दिमाखदार उद्घाटन झाले.

संस्थेचे उपक्रम:

  • योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तरणतलाव आणि क्रीडासंकुल