संस्थेचे उपक्रम

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

क्रीडा संकुल

योगी श्री अरविंद स्मृती पुरस्कारः

दरवर्षी योगी श्री अरविंद घोष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगी श्री अरविंद स्मृती पुरस्कार हा विज्ञान, शिक्षण, आदिवासी, क्रीडा, पर्यावरण, सामाजिक कार्य इ. क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

गुणवंत शिक्षक पुरस्कारः

गुरुकुलातील अध्यापनात नाविन्य व कल्पकता यांचा वापर करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेे.

गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारः

गुरुकुलातील कार्यालय, स्वयंपाक गृह, तरणतलाव आणि क्रीडासंकुल इ. ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेे.

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा:

संस्थेचे कार्यकरी मंडळातील सदस्य, पदाधिकारी आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा वर्षभरात किमान तीनवेळा आयेजित केल्या जातात. गुरुकुलातील शिक्षक विषेश कार्य करणाऱ्या शाळा, संस्था यांना भेट देतात.