संगणक दालनः

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

संगणक दालनः

 

गुरुकुलातील संगणक दालनात एकूण 20 संगणक आहेत. इ.1ली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी हेडफोनद्वारे इंग्रजीतून सूचना ऐकत संगणक प्रक्टिकल करतात. हेे छोटे विद्यार्थी माऊस, किबोर्ड सहजपणे हाताळतात. इ.5वी ते 8वीचे विद्यार्थी बेसिक संगणक प्रोग्राम एम.एस.ऑफीस - वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, पेजमेकर, कोरल ड्रॉ इ.चा वापर उत्कृष्टपणे करतात. जाहिराती,वेळापत्रक, मराठी डीटीपी, विविध विषयांवरचे प्रकल्प सादरीकरण तसेच स्लाईड शोचे प्रेझेंटेशन यासाठी संगणकाचा वापर करतात. इंटरनेटच्या माध्यमातून यू-टयूबवरुन विद्यार्थी विज्ञानातील प्रयोग, भौगोलिक घटना इ.ची प्रत्यक्ष माहिती मिळवितात. इ. 9वी,10वी साठी शासनाचा ICT हा विषय असल्यामुळे त्यानुसार ‘जिओजिब्रा’ सॉफ्टवेअर शिकविले जाते. त्यामुळे भूमितीची प्रमेय व आकृत्या समजण्यास विद्यार्थ्यांना सोपे जाते.

इ.8वी,9वी च्या विद्यार्थ्यांची एम.के.सी.एलची एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) कोर्सची परीक्षा देण्याइतकी संगणक अभ्यासक्रमाची तयारी झालेली असते. यावर्षीपासून योगी श्री अरविंद गुरुकुल संगणक केंद्र हे एम.एस.सी.आय.टीचे अधिकृत उपकेंद्र झाले आहे. त्यामुळे इ. 8वी ते10वीचे विद्यार्थी व अन्य इच्छूक व्यक्तीदेखील एम.एस.सी.आय.टीची परीक्षा देऊ शकतात.