फंक्शनल इंग्लिश कोर्स

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

फंक्शनल इंग्लिश कोर्स

गुरुकुलामध्ये इंग्रजी ही एक ‘भाषा’ म्हणून शिकवली जाते. शिशुवर्गापासून इंग्रजीचा संभाषण वर्ग चालविला जातो. मातृभाषेप्रमाणे मुले इंग्रजी शिकतात. श्रवण, संभाषण आणि वाचनावर भर दिला जातो. इ. 7 वी, 8 वीच्या टप्प्यावर मुले इंग्रजीतून सर्व प्रकारचे लेखन करतात. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आल्यावर मुले कोणताही विषय इंग्रजीतून सहजगत्या आत्मसात करतात. इ.7 वीमधील मुले केंब्रिज युनिव्र्हसिटीची यंग लनर्स ही इंग्लिश परीक्षा देतात. इ. 8 वीची मुले शालान्त परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवितात. गुरुकुलातील मुलांचे पालक स्वेच्छेने हा वर्ग चालवितात.