पंचकोष

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

पंचकोष विकसन शिक्षण

निसर्गामध्ये जशी पंचमहाभूते असतात तसेच आपल्या शरीरात पाच कोष असतात. या पाचही कोषांचा विकास अगदी सुरुवातीपासून झाल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होतो. असा विकास मुलांच्या पुढील संपूर्ण जीवनातील यशाचा पाया असतो.

योगी अरविंद गुरुकुलामध्ये पंचकोष विकसनाच्या भक्कम पायावर विद्यार्थ्यांच्या विकासाचा अभ्यासक्रम आधारलेला आहे. गुरुकुलात प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास होण्यामागे हेच रहस्य आहे.

अन्नमय कोष

वाढत्या वयात शरीराची भूक जेव्हा भागलेली असते तेव्हाच खरी शिकण्याची इच्छा जागी होते.

प्राणमय कोष

संतुलित व्यायाम व खेळ यांचे आधारे शरीराचा विकास. स्वस्थ शरीर हे स्वस्थ मनाचे स्वाभाविक घर आहे.

मनोमय कोष

कल्पकता, सृजनशीलता, समजशक्ती वाढवणे यासाठी विविध मार्गांनी मनोविकास

विज्ञानमय कोष

माहिती, संख्यात्मक तथ्य समजून घेण्याची व विश्लेषण करण्याची क्षमता

आनंदमय कोष

प्रार्थना, साधना या मार्गाने विद्यार्थ्याचा आत्मिक विकास