ग्रंथालय

योगी श्री अरविंद गुरुकुल    07-Jun-2015

ग्रंथालय

प्रत्येक ग्रंथ म्हणजे असते एक निमंत्रण
कधी झपूर्झाचे, कधी हिरव्या हिरव्या गार गालिच्यांचे
निळया आभाळात उडू लागतात शुभ्र विचारांचे पक्षी
तेव्हा उगवते इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर


 

  विद्यार्थी ग्रंथालय:

गुरुकुलातील संगणकीकृत ग्रंथालयात एकूण 6,000 पुस्तके, 250 सीडीज् आणि कॅसेट्स आहेत तसेच 6 नियतकालिके आणि 3 वर्तमानपत्रे नियमितपणे येतात.

ग्रंथालयातील संग्रहात विविध विषयांवर अनेक पुस्तके तसेच संदर्भग्रंथ आहेत. पुराणकाळातील वेदांपासून ते आधुनिक काळातील एनसायक्लोपीडीयापर्यंत अनेक संदर्भसाहित्य आहेत. लघुकथा, ललितलेखन, आत्मचरित्रे, चरित्रे, प्रवासवर्णने, कविता, नाटक असे सर्वच लेखनप्रकार मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. शिशुवर्गापासूनची मुले बालसाहित्य विभागात रमतात.

मराठी माध्यमाची शाळा असूनही मुलांसाठी इंग्रजी साहित्याचा विपुल खजिना आहे. हिंदी आणि संस्कृत भाषांमधील साहित्यसंपदा ग्रंथालयात आहे.

सार्वजनिक ग्रंथालय:

दि. 26 जानेवारी 2015 पासून ग्रंथालय समाजासाठी खुले करण्यात आले आहे आणि त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.