योग दिन

योगी श्री अरविंद गुरुकुल    21-Jun-2015

 

दि. 21 जून 2015 हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला.  21 जून हा दिवस भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी सर्वांचे आरोग्य प्रकाशमय व निरामय व्हावे या हेतूने सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासमवेत या दिवशी प्राणायमचे प्रकार भुजंगासन, त्रिकोणासन, चक्रासन, अर्धमच्छिंद्रासन, शवासन, मकरासन हे आसनांचे प्रकार करुन मन व शरीर यांना चैतन्याचा अनुभव मिळाला.

      योगासनांमुळे मिळणारे आरोग्य याचे महत्व क्रीडा शिक्षकांनी विशद केले. इ. 5 वी ते 10 वीचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि 45 ते 50 पालक उपस्थित होते.