जिजामाता पुण्यतिथी निमित्त योगी श्री अरविंद गुरुकुलमध्ये कु. पùश्री राव व त्यांचे सहकारी श्री. अनिल नलावडे यांना आमंत्रित केले होते. शिवाजी महाराज कसे घडले? जिजाबाईंनी त्यांच्यावर कसे संस्कार केले? हे श्री. अनिल नलावडे यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सादर केले. श्री अनिल नलावडे यांनी स्वतः रचलेल्या कवितांना चाली लावून मग त्यांचे सादरीकरण केले.